समाजातील
तळागाळातील लोकांचं भलं करण्याचं आश्वासन, आपण सारे एक आहोत असं सांगत
राष्ट्रवादाची केलेली अचूक पेरणी आणि सातत्यानं देश, देव, धर्म, समाज खतरे में है
असे दिलेले नारे या सा-या फॅसिझमच्या खूणा आहेत असं इको सांगतो. देशातील कडव्या,
उजव्या संघटनांना ही सारी लक्षणं लागू होतात. भाजप आणि संघ आणि त्यांच्या
परिवारातील अन्य संस्था. हे सारे स्वतःच सांगताहेत की तेच खरे देशभक्त,
राष्ट्रवादी आहेत. सर्वांना एक करण्याचा त्यांचा ध्यास आहे. देशाबद्दल प्रेम असणं,
अभिमान असणं वाईट नाही की चूकीचं नाही पण देशातील चूकीच्या गोष्टींकडेही डोळेझाक
करायची, सर्वांना सारखं मानून या देशात सारं काही ठिकठाक आहे अशी ग्वाही देणं, या
देशाला एकच धर्म आहे, एकच धर्म ग्रंथ आहे, एकच संस्कृती आहे असं सांगत अन्य
लोकांचा अनादर करणं चूकीचं आहे. पण असं घडताना तर दिसत आहे. आपण काश्मीर, नागालॅड,
आदिवासी, दलित समूह यांना इथं विसरायला नको.
No comments:
Post a Comment