फॅसिझम
हा वैयक्तिक किंवा सामाजिक नैराश्यातून जन्माला येऊ शकतो. मध्यम वर्ग त्याला जन्म
देतो. भविष्यातील फॅसिझम या लोकांमधूनच पोसला जाईल असं इको सांगतो. मोदी सरकार
विकासाची घोषणा देऊन सत्तेवर आलं. त्याला मध्यम वर्गानं निवडून आणलं. हा मध्यम
वर्ग अतिशय स्वार्थी आहे असं अनेक लोक सांगतात. त्यांना श्रीमंतांचा हेवा वाटतो
आणि ते गरीबांचा तिरस्कार करतात असं म्हणतात. एकेकाळी या देशातील सरकारं
गरीबांमुळे निवडली जात. पण आता ती या वाढत्या मध्यमवर्गामुळे निवडली जातात.
त्यांना सारं काही हवं आहे आणि लवकर हवं आहे. त्यासाठी ते कोणाच्याही मागे जातील व
कोणालाही निवडून आणतील त्यापुढे ते परिणामांचा विचार करणार नाहीत कारण त्यांचा
स्वार्थ त्यांच्या डोळ्यांवर व मेंदूवर घट्ट बसला आहे ज्यात काहीच शिरू शकत नाही.
हा वर्ग या देशात फॅसिझम घेऊन येईल का?
No comments:
Post a Comment