Wednesday, 7 June 2017

भाग ९ - मोदी सरकार आणि फॅसिझमचा धोका

शाश्वत फॅसिझम हा न्यूस्पिक किंवा ज्याला आपण नवभाषा म्हणू शकू, त्याचा वापर करतात. ही नवभाषा इतिहासाचं पुनर्लेखन असू शकते. ती जनतेच्या मनाचं प्रतिनिधित्व करणारी आहे असाही दावा केला जाऊ शकतो. शिक्षणाचं भगवेकरण, संस्कृत भाषेच्या पुनरुज्जीवनाचा अट्टहास (याला विरोध असण्याचं कारण नाही खरं तर कारण भाषा मग ती कोणतीही असो टिकायलाच हवी पण त्यामागे जेव्हा धार्मिक व राजकीय कट्टरतावाद असतो तेव्हा अडचण होते), इतिहासाचं पुनर्लेखन, राष्ट्रवाद जोपासण्यासाठी केल्या जाणा-या उपाययोजना, देशभक्तीची लस पाजण्याची भाषा हे सारं या नवभाषेत समाविष्ट करता येईल. आधीच्या मुद्द्यातील मोदींचा मन की बात हा कार्यक्रम आणि त्यांचा समाजमाध्यमांवरचा वापर अशाच प्रकारचा आहे असं म्हणता येऊ शकतं.

No comments:

Post a Comment